पुणे : कार्यालयात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत सलग तीन वर्ष तिच्यावर बलात्कार करणाऱ्या कोथरूडमधील एका सीए ला पोलिसांनी अटक केली. आरोपीने पीडित महिलेला आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. 2019 ते 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी एका 50 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध सतीश शेठ (वय 42, कांचनगंगा होम्स, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) हा व्यावसायाने सी ए आहे. कोथरूड परिसरात त्याचं कार्यालय आहे. फिर्यादी महिला त्याच्या कार्यालयात नोकरी करत होती. मार्च 2019 मध्ये अनिरुद्ध शेठ यांनी फिर्यादी महिलेला क्लाइंटला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भुगाव इथं नेलं. 


भुगाव इथल्या फ्लॅटवर गेल्यानंतर आरोपीने पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध देऊन त्या महिलेसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी सोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. मुंबई, पुणे आणि अलिबाग इथल्या हॉटेलमध्ये आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीत वेळोवेळी हा प्रकार घडला. 


दरम्यान काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध शेठ याने या महिलेसोबत पुन्हा जबरदस्ती करत याविषयी कोणाला सांगितल्यास महिलेला आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. या सर्व प्रकाराला त्रासलेल्या पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.