झोपेतच पतीला संपवण्याचा प्रयत्न; पत्नीनं अंगावर ओतलं उकळतं पाणी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील वारजे भागातील एका सोसायटीत हा सगळा प्रकार घडला आहे.झोपेत असतानाच पत्नीने पतीच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) एका पत्नीने त्याच्या पतीसोबत केलेल्या धक्कादायक कृत्याने एकच खळबळब उडाली आहे. पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर टाकले उकळते पाणी टाकलं आहे. पुण्यातील वारजे येथे पती झोपेत असतानाच पत्नीने त्याच्या अंगावर पाणी ओतले. झोपेतच पत्नीने पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. यानंतर जखमी पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वारजेच्या शिवणे येथील एका सोसायटीत गुरुवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेत पती गंभीररीत्या भाजला असून, रुग्णालयात उपचार सुरू महादेव जाधव असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पत्नीच्या भावाला दिलेल्या पैशाच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
महादेव जाधव यांनी या सगळ्या प्रकाराबाबत वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव पती-पत्नी भाजीपाला विकण्याचे काम करतात. महादेव जाधव यांनी त्यांच्या पत्नीच्या भावाला दोन लाख 40 हजार रुपये दिले होते. त्यामुळे महादेव जाधव सतत पत्नीकडे पैशांची मागणी करत होते. याच कारणावरुन पती-पत्नीत सातत्याने वाद होत होते. गुरुवारी पहाटे महादेव जाधव हे घरी झोपलेले असताना पत्नीने त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकले. उकळत्या पाण्यामुळे महादेव जाधव हे गंभीररित्या भाजले. या हल्ल्यात जाधव हे 50 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.
एकतर्फी प्रेमातून महिलेला दांडक्याने मारहाण
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून महिलेला दांडक्याने मारहाण करून डोके फोडले आहे. कोरेगाव पार्कमधील बर्निग घाट परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संकेत शहाजी म्हस्के असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा महिलेचा मित्र होता. दोघेही एकाच परिसरात राहायला आहेत. गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला आरोपीसोबत बोलत नव्हती. त्याच रागातून संकेतने बुधवारी तिला बर्निग घाट परिसरात गाठले आणि तिच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केली.