Pune Crime News : क्रिकेट गेल्या अनेक वर्षापासून पैसे कमवण्याचं माध्यम झालंय. ऑनलाईन बेटिंग अॅप्सचा सुळसुळात होण्याआधी मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात होता. पोलिसांनी यावर अनेकदा वचक बसवल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता पुण्यात धक्कादायक घटना घडल्याचं पहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये  (IPL Betting) एका तरुणाने सट्टा लगावला होता. सट्टा खेळताना तो तब्बल 6 लाख रुपये हरला. या पैशांच्या वसुलीसाठी चार तरुणांनी त्याचं अपहरण (Kidnapping Case) केलं. जोपर्यंत 10 लाख देत नाही तोपर्यंत डांबून ठेवणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. नेमकं काय झालं होतं? पोलिसांनी (Pune Police) प्रकरणाचा छडा कसा लावला? पाहा...


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आव्हाळवाडी येथील एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद नोंदवली होती. महिलेचा पती ऑटो गॅरज चालवतो. त्याचबरोबर त्याला सट्टा खेळण्याचा नाद होता. आयपीएल सुरू असताना त्याने सट्टा लावला अन् त्याच्या आनंदावर पाणी फेरलं गेलं. सट्ट्यात तो तब्बल 6 लाख रुपये हारला. त्यानंतर सुरू झाली ती वसुली... आरोपींनी तरुणाचा पिच्छा सोडला नाही. आरोपींनी पैश्यांसाठी तगादा लावला. मात्र, आरोपीने पैसे देयचा टाळाटाळ केली. एक दिवस वसुलीसाठी आरोपींनी थेट अपहरणाचा प्लॅन रचला. शनिवारी पहाटेचा 3 चा टाईम ठरला.


आरोपी विजय गुब्याडकर आणि नागेश एलमल्ली यांनी शनिवारी पहाटे कारमधून तरुणाच्या घरी गेले. तिथून त्याला उचलला आणि त्याच्या पत्नीला धमकी दिली. जोपर्यंत 6 लाखाचे 10 लाख देत नाही, तोपर्यंत नवरा घरी येणार नाही, अशी थेट धमकी देण्यात आली. त्याचवेळी त्याला मायंदळी तुडवला. पत्नीने काहीही विचार न करता थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना सर्व हकिकत सांगितलं.


आणखी वाचा - Pune Crime News: तिची 'जात' कोणती? सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत!


दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात आरोपी हे सोलापूरला घेऊन गेल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार केलं. पोलीस पथक तातडीने सोलापूरला रवाना झालं अन् प्लॅन तयार केला. पोलिसांनी फिर्यादीच्या पतीची सुटका करुन दोन्ही आरोपींना पकडलं आहे. तपासात एक मोठी टोळी आयपीएल सट्टा चालवत होती, असं समोर आलंय. सोलापूरमध्ये देखील काही गुन्हे दाखल असल्याचं तपासात समोर आलं आहे.