देशातील टॉप टेनमध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम
कामाची अनोखी पद्धत, योग्य नियोजन, एखाद्या गोष्टीवर तात्काळ तोडगा काढण्याचे
मुंबई : देशातील 742 जिल्हाधिकाऱ्यांपैंकी टॉप टेनमध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम हे निवडले गेले आहेत. देशात फेम इंडिया मॅगझीनने एशिया पोस्टसोबत सर्व्हे केला. या सर्व्हेत 742 जिल्हाधिकाऱ्यांमध्ये नवलकिशोर राम यांचा नंबर पहिल्या दहात लागतो.
कामाची अनोखी पद्धत, योग्य नियोजन, एखाद्या गोष्टीवर तात्काळ तोडगा काढण्याचे कसब यावर त्यांच्या यशाचे गमक ठरते. नवलकिशोर राम यांनी आपत्ती काळात अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. त्यामुळे कोणतीही संकटकालीन परिस्थिती हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे.
कोणतेही काम घेऊन आलेल्या व्यक्तीचे म्हणणे शांततेत ऐकून घेणे, त्यावर तात्काळ मार्ग काढणे हा त्यांच्या स्वभावाचाच एक भाग आहे. सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेऊन ते काम करतात.
बीडमधील जलयुक्त शिवारची योजना असो अथवा इतर सरकारी योजना, सर्वसामान्य जनतेचे समाधान होईपर्यंत ते मागे हटत नाहीत. पुण्यातील कोरोना परिस्थितीही त्यांनी योग्य प्रकारे हाताळली आहे.