पुणे : पुणे जिल्ह्यातील एका दिग्गज राजकीय नेत्यांच्या मुलांच्या सोयरीकीच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ती मुलगी ठाकरे परिवाराची सून होणार आहे. दोघांचे लव्ह मॅरेज आहे. परदेशात एकत्र शिक्षण घेत असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कुटुंबियांनी त्यासाठी होकार दिला असल्याचं कळतंय. त्यामुळे लवकरच साखरपुडा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही परिवार दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबधित आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही ते एकत्र येणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता ठाकरेंमधील नेमका कोणता ठाकरे नवरदेव होणार हे विचारण्याची घाई इतक्यात करु नका.


आणखी एक दुसरी राजकीय घराण्यातली सोयरीकी


तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील दोन दिग्गज राजकीय घराणी सोयरीकीची चर्चा जोरात सुरू आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मुलीचीशी ठरले आहे. 


डॉ. निवेदीता ही चंद्रशेखर घुले यांची मुलगी आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकीय सोयरीकीची चर्चा सुरू आहे. 


घुले आणि गडाख हे कुटुंब राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. घुले राष्ट्रवादीचे आहेत. ते विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्या मतदारसंघातून इच्छुक आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून शिवाजी कर्डिले हे उत्सुक असल्याचं कळतंय. कर्डिले हे त्यांचे इतर पक्षात असलेल्या सोय-यांच्या मतदीने मैदान पारण्याच्या प्रयत्नात असल्याचं कळतंय.