पुणे : Farmer hired Helicopter : महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. देशातील हे असे क्षेत्र आहे जिथे शेतकरी अत्यंत गरीब समजला जातो आणि येथे आत्महत्येच्या घटना घडत असतात. पण त्याच महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने आपल्या नातीसाठी असे काही केले ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीच्या जन्माचे जोरदार स्वागत. शेतकऱ्याने आपल्या नातीसाठी असे काही केले की सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या बालवडकर कुटुंबीयांनी त्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या क्रिशिका या कन्येचे स्वागत जरा अनोख्या पद्धतीने केलंय. त्याची चांगलीच चर्चा बालेवाडी परिसरात पाहायला मिळत आहे. कुटुंबात नवजात नातीचे जोरदार स्वागत करण्यात आले. (Farmer hired helicopter for newborn granddaughter)



पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आपल्या नातीच्या जन्माने इतका आनंद झाला की त्यांनी मंगळवारी नवजात मुलीला घरी आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. पुण्यातील बालेवाडी परिसरात राहणारे अजित पांडुरंग बालवडकर यांनी सांगितले की, त्यांना त्यांची नात कृषिका हिचे भव्य स्वागत करायचे होते.



घरात नात झाली म्हणून आजोबांनी सून आणि नातीला तिच्या माहेरुन चक्क हेलिकॉप्टरमधून आणून आनंद व्यक्त केला. घरात मुलगी जन्माला आली की अनेक जण नाराजी व्यक्त करतात, पण मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता बालवडकर कुटुंबीयांनी नातीचे केलेले हे स्वागत नक्कीच कौतुकास्पद आहे. नातं हीच आता आमच्या वंशाचा दिवा आहे. इथून पुढे तीच आमच्या घराण्याचा आणि वंशाचा नाव वाढवेल, अशा भावना यावेळी बालवडकर कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. सासरे अजित बालवडकर यांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केल्याने सून अजित बालवडकर ही भरावून गेली आहे.