पुण्याचे (Pune) पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यासमोरच एका कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रचाराचे गाणं वाजल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्यात (Pune) एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी डीजेवर (DJ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाणं सुरु झालं. चंद्रकांत पाटील (chandrakant patil) तिथून आले असतानाच हे गाणं सुरु झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर आता ही साऊंड सिस्टीम विनापरवाना लावल्याचे सांगत पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळी निमित्त पुण्यातील रास्ता पेठेत असलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील येताच डीजेवर अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत लावले. यानंतर पोलिसांनी साऊंड सिस्टीम लावणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. साऊंड सिस्टीम विना परवाना लावण्यात आली असे कारण देत डीजेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान, पुण्यात बोलताना चंद्रकात पाटील यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला गेला आहे.यावरून विरोधक आक्रमक झाले असून शिंदे सरकारवर टिका केली जात आहे. यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. मला बऱ्याच गोष्टी या तुमच्याकडूनच कळतात. याबाबतही तुमच्या कडूनच मला कळाल. मी आता याबाबत नीट माहिती घेतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.


सध्या नोटांवर फोटो बदलण्याची मागणी सातत्यानं होत असल्याचं पाहता शिवसैनिकांकडून राणेंचे (Narayan Rane) फोटो व्हायरल केले जात आहेत. याबाबत पाटील यांना विचारलं असता, 'दोन विरोधी पक्ष असतात. ते बऱ्याच वेळेस विचारांच्या आधारे विरोधक असतात. त्यामुळे विचारांची लढाई लढली पाहिजे. पण, वैक्तिक टीका टिप्पणी करू नये', असा विचार त्यांनी यावेळी मांडला.