पुणे : कल्याणीनगर कोरेगाव पार्क भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या घोडागाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत बेफाम झालेली घोडागाडी भररस्त्यावर धावताना दिसत आहे. चालकाशिवाय धावणाऱ्या या घोडागाडीचा पाठलाग बाईकस्वार करताना या व्हिडिओत दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाईकस्वार आणि घोडागाडी यांच्यात शर्यत तर लागली नाही ना? असा प्राथमिक अंदाज वाटतो. मात्र व्हिडिओ पुन्हा एकदा नीट पाहिल्यावर लक्षात येतं चालक नसलेली ही घोडागाडी भररस्त्यात धावत आहे. त्यांना लगाम घालण्यासाठी घोडागाडी चालक मागून बाईकवरून येतो. 


चालक घोड्याचा लगाम पकडून त्याला थांबवण्याचा विचार करतो. मात्र त्याचवेळी घोडा अचानक थांबल्यामुळे मुलाचा तोल जातो आणि तो त्या घोड्यावर पडतो. याचवेळी घोडागाडीच्या चाकाखाली मुलगा पडतो आणि त्याच्या अंगावरून ही गाडी जाते. अखेर अचानक ब्रेक लागल्यासारखा घोडा थांबल्यावर दुचाकीवर मागे बसलेला युवक खाली पडतो आणि त्याच्या अंगावरून घोडा गाडीचे चाक जाताना व्हिडिओत दिसत आहे.थरारक असा काळजात धडकी भरणारा असा हा व्हिडिओ आहे.


 


घोडागाडीचा हा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चालकाशिवाय घोडे गाडी घेऊन धावताना या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या बाईकवर एकावेळी तीन तरूण बसल्याचे स्पष्ट होते. वाहतूकीचे नियम बाजूला करत बाईकवरून तरूण जाताना दिसत आहेत.