पार्किंगच्या वादातून पुण्यात इंजिनीअरची हत्या
वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे कार पार्किंगची समस्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कार पार्किंगच्या वादातून एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे कार पार्किंगची समस्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कार पार्किंगच्या वादातून एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी केली तिघांना अटक
मृतक सॉफ्टवेअर इंजिनीअरचं नाव नेवल बत्तीवाला असं आहे. नेवलच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अनेक दिवसांपासून सुरु होता वाद
शनिवारी सायंकाळी पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेवलच्या बाजुला राहणाऱ्या टूरिस्ट कंपनीच्या ड्रायव्हर्ससोबत गेल्या अनेक दिवसांपासून पार्किगवरुन वाद सुरु होता.
पार्किंगवरुन सुरु होता वाद
आरोपी हे नेवल यांच्या घरासमोरील रस्त्यावर गाड्या लावायचे. नेवलच्या घरासमोर कार पार्किंग केल्यावरुन नेवल आणि या ड्रायव्हर्समध्ये अनेकदा वाद झाला होता. घटनेच्या दिवशीही नेवल आणि त्या ड्रायव्हर्समध्ये वाद झाला.
हा वाद इतका वाढला की, टूरिस्ट कंपनीचा मालक आणि दोन ड्रायव्हर्सने नेवल बत्तीवाला याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नेवलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
स्वत:च पोहोचला रुग्णालयात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टूरिस्ट कंपनीचे मालक गणेश रासकर आणि ड्रायव्हर्स (योगेश कडवे, विक्रम भोंबे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, जखमी नेवलने स्वत: पोलिसांना फोन केला आणि रुग्णालयातही उपचाराकरीता पोहोचला होता.