Pune Kasaba Bypoll Election Result 2023 : कसबा पेठ (Kasbah Peth) मतदारसंघात भाजला कौल मिळत आला आहे. ( Kasba Bypoll Election) मात्र, मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली. परंतु ही पोटनिवडणूक भाजपला जिंकता आलेली नाही. (BJP Loss) यामागे अनेक कारणे आहेत. (Pune Kasaba Bypoll Election Result ) यात भाजपचा अतिआत्मविश्वास नडल्याचे दिसून येत आहे. तसेच एखाद्या मतदारसंघात निवडणून आलेल्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाते. मात्र, यावेळी भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न देता दुसरा उमेदवार दिला. दरम्यान, राज्याच्या राजकारणात अलिखित एक नियम असतो की, एकाद्या लोकप्रतिनीचे निधन झाले की तेथे उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध करायची. पण भाजपने ही प्रथा मोडली. आता त्यांनाच याचा कसबा पेठमध्ये  फटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसबा पेठ येथे भाजपला नेहमी कौल मिळत आला आहे. मात्र, पोटनिवडणुकीच्या माध्यमातून तब्बल 28 वर्षानंतर भाजपचा मतदारसंघातत पराभव झाला आहे. यापूर्वी 1992 मध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अण्णा थोरात यांनी गिरीष बापट यांचा पराभव केला होता. त्यानंतर 1995 पासून ते 2019 पर्यंत भाजपने विजयी मिळवला आहे. भाजपने कसबा पेठेत प्रचार करताना हरतऱ्हेने प्रचार केला. मात्र, त्याचा काहीही प्रभाव पडला नाही. खासदार गिरीश बापट आजारी असताना त्यांना व्हिलचेरवर आणून प्रचारात उतरवले. यामुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली. तसेच भाजपवर पैसे वाटपाचा आरोप झाला. याचाही फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे.  आजारी असताना त्यांना प्रचारात उतरवणे यामुळे चुकीचा संदेश मतदारांमध्ये गेला.


भाजप पराभवाची ही आहेत प्रमुख कारणे...


- भाजपने पहिल चूक केली ती टिळक कुटुंबात तिकीट दिले नाही. टिळक कुटुंबातून इच्छा असताना दुसरा उमेदवार दिला. कसबा पेठ येथे जातीय समीकरण आहे. ब्राम्हण समाजाची आणि संघ परिवाराची काही प्रमाणात नाराजीचा फटका भाजपला बसला


-  गिरीश बापट यांच्या तुलनेत हेमंत रासणे यांचा तेवढा करिश्मा नाही. त्यांचा जनंसंपर्काचा अभाव आणि भाजपची उमेदवारीमध्ये अनेकजण शर्यतीत असल्याने याचा फटका भाजपला बसला.


- तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांची प्रतिमा उजवी ठरली. सगळ्यांना भेटणारा कार्यकर्ता अशी ओळख त्यांच्या विजयात कामी आली. आपला माणून अशी त्यांची ओळख मतदारसंघात दिसून आली. 
 
- महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकोप्याने लढले. त्यांच्यात चांगला समन्वय दिसून आला. तसेच धंगेकर यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या कामी आला.


- भाजपने पैसाचा वापर केल्याचा आरोप झाला. दादागिरी आणि दडपशाही याचा वापर केला असा आरोप भाजपवर झाला त्याचाही फटका काही प्रमाणात बसल्याचे म्हटले जात आहे.