रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा सुरु, अशी असेल लोकलची वेळ
Pune Lonavala Local Train : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या काळात पुणे-लोणावळा रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. ती लोकल सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
Pune to Lonavala Local Timetable 2024 News In Marathi : पुणे शहरातून लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे उपनगरात राहणाऱ्या अनेक जणांसाठी हा प्रवास नित्याचा असतो. परंतु त्यांना गेल्या काही महिन्यांपासून ही सुविधा मिळत नव्हती. मात्र आता पुणे-लोणावळा याच रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून दुपारच्या वेळी बंद असलेली पुणे (शिवाजीनगर) - लोणावळा लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना या लोकलचा अधिक फायदा होणार आहे. कोरोनाकाळात दुपारच्यावेळेत पुणे-लोणावळा येथून सुरू होणारी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र कोरोनाचे सावट संपले तरीही दुपारच्या वेळीतील ही सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारी शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी येत होत्या. तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी वाट पाहावी लागली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दुपारच्या वेळेतच लोकल सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. मात्र आता या मागणीला यश मिळाले असून पुणे रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार शिवाजीनगर येथून दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी ही लोकल सुटेल आणि 12 वाजून 45 मिनिटांनी लोणावळा येथे पोहचेल. तर रात्री 11.30 ला लोणावळ्याहून लोकल सुटेल आणि 1 वाजून 20 मिनिटात शिवाजीनगरला पोहोचते. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर दुपारची लोकल सेवा सुरू करण्यासाठी काही प्रवासी आणि राजकीय संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातून डेक्कन क्वीनला निघाले आणि मुंबईला पोहोचायला अर्धा तास उशीर झाला. त्याचा परिणाम इतर गाड्यांप्रमाणेच झाला. दरम्यान या आंदोलनानंतर लगेचच शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.