Pune Online Fraud: सोशल मीडियामुळे (Social Media) अनेकांना आपली मतं मांडण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. मात्र त्यावेळी या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक (Cyber Crime) होण्याचे प्रकार वाढले आहे. अनेकदा फसवणूक करणारे ऑनलाइन स्कॅमर्स नव्या नव्या माध्यमातून लोकांना गंडा (Online Fraud) घालत असतात. असाच काहीसा प्रकार पुण्यात (Pune Crime) एका व्यक्तीबरोबर घडला आहे. जास्त पैसे कमवण्याचा नादात एका 43 वर्षीय व्यक्तीने लाखो रुपये गमावले आहेत. एका वृत्तपत्राने यासंदर्भातील बातमी दिली असून हा प्रकार हिंजवडीमध्ये (Hinjewadi Pune) घडला आहे. 


मेसेजवरुन आली लिंक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 आणि 15 जानेवारीदरम्यान फसवणूक झालेल्या या व्यक्तीच्या खात्यामध्ये तब्बल 12 लाख 24 हजार रुपये गायब झाले आहेत. व्हिडीओ लाइक करण्यासाठी पैसे मिळतील असं या व्यक्तीला सांगण्यात आलं होतं. मात्र याच माध्यमातून त्याला गंडा घालण्यात आलं. व्हिडीओ लाइक केल्यास तुम्हाला पैसे मिळतील असं फसवणूक करणाऱ्याने सांगितलं. तसेच हे पैसे पुन्हा गुंतवल्यास अधिक पैसे मिळतील असं सांगून ही लाखो रुपयांची फसवणूक केली.


प्रत्येक लाइकला 50 रुपये


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडीमधील राहणारी ही व्यक्ती एका खासगी कंपनीमध्ये काम करते. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी फोनवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये एक लिंक होती. या लिंकवर व्हिडीओ दिसतील. प्रत्येक व्हिडीओ लाइक केल्यावर एका लाइकला 50 रुपये या दराने तुम्हाला पैसे मिळतील अशी ऑफर देण्यात आली. यासाठी तुम्ही आधी बँक अकाऊंटचे डिटेल्स शेअर करावेत असं सांगण्यात आलं. तुमच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. 


आधी पैसे आले मग स्कीम सांगितली


या व्यक्तीने लिंकवर क्लिक करुन आपल्या नावाबरोबर खासगी माहिती आणि बँकेचे डिटेल्स भरले. त्यानंतर त्याला तीन व्हिडीओ या लिंकवर पाठवण्यात आले. हे लाइक केल्यावर त्याच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले. हे पैसे मिळ्यानंतर या व्यक्तीला फसवणूक करणाऱ्यांनी एका स्कीमबद्दल सांगितलं. तुम्ही समोरुन पैसे गुंतवल्यास अधिक पैसे परत मिळतील असंही या फसवणूक करणाऱ्या स्कॅमर्सने या व्यक्तीला सांगितलं.


...अन् फसवणूक झाल्याचं लक्षात आलं


या व्यक्तीने सुरुवातीला एक हजार रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून केले. त्याला रिटर्न म्हणून 9 हजार रुपये मिळेल. त्यामुळे या व्यक्तीने अधिक गुंतवणूक केल्यास जास्त पैसे मिळतील असा विचार केला. त्यानंतर त्याने आपल्या बँक खात्यामधील 12 लाख २४ हजार रुपये या व्यक्तींच्या खात्यावर ट्रान्सफर केले. दुसऱ्या दिवशी रिटर्न्स मिळतील असं या व्यक्तीला सांगण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी पैसे आले नाहीत म्हणून फोन लेका असता समोरुन कोणतंही उत्तर आलं नाही. फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडीओच्या लिंकही डिलीट करुन टाकल्या. आपली फसवणूक झाल्याचं या व्यक्तीला समजल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. सध्या पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.