किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : रिक्षावाल्यानं प्रेयसी पळवली म्हणून एक पुणेकर चक्क चोर बनला, त्यानं एक दोन नव्हे तब्बल ८० रिक्षावाल्यांचे मोबाईल चोरले. एका रिक्षाचालकानं आसिफ शेखची गर्लफ्रेंड पळवली. त्यामुळं त्यानं रिक्षाचालकांचे मोबाईल लंपास करायला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षाचालकांचे चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. प्रेयसी पळवून नेल्याचा सूड उगवण्यासाठी या प्रेमवीरानं निवडलेला मार्ग पाहून पोलीस चक्रावून गेले.


आसिफ उर्फ बोहरा शेख असे या चोरट्याचे नाव आहे. आसिफची प्रेयसी ही गुजरातची होती. दोघांची लव्हस्टोरी चांगली सुरू असतानाच तिचे काही महिन्यांपूर्वी एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले. आसिफला याबाबत कल्पना यायच्याआधीच तिने रिक्षावाल्यासोबत पळ काढला. 


प्रेयसी रिक्षाचालकाबरोबर पळून गेल्यामुळे आसिफला धक्का बसला. आसिफला प्रेयसीचा राग होताच, पण त्याला रिक्षाचालकांचीही चीड आली. याच रागातून त्याने रिक्षाचालकांना लक्ष्य केलं आणि ८० रिक्षावाल्यांचे मोबाईल त्याने चोरले.