COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनी पवार , झी मिडीया , पुणे : युट्युब चॅनेल्सची सध्या चांगलीच चलती आहे...पण अशा चॅनेल सुरु करण्यात फक्त तरुणाईच पुढे आहे असं नाही कारण पुण्यातील मीरा विश्वासरा  या ४५ वर्षीय महिलेने आपलं स्वत:चं यु टयुब चॅनेल सुरु केलयं,, ज्याचे तब्बल ८ हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.  शिक्षण केवळ सहावी मात्र स्वयंपाकाची त्यांना भारी आवड आहे. आपल्या या आवडीमुळेच त्यांनी स्वताची ओळख निर्माण केलीये.. आणि त्यासाठी त्यांना  त्यांचे पती विश्वासराव यांनी मदत केलीये. त्यांनी स्वताचं यू-ट्यूब चॅनल सुरु केलं आणि मीरा यांच्या पाककृती त्यावर शेअर केल्या. सध्या त्यांना तुफान प्रतिसाद मिळतोय.


आर्थिक उत्पन्न 


शंकर विश्वासराव स्वत: व्हिडियो शूट करुन यूट्यूबर अपलोड करतात. त्यासाठी लागणारं प्रशिक्षण त्यांनी घेतलंय.. आपल्या राहत्या घरीच त्यांनी शुटींसाठी छोटेखानी सेटही तयार केलाय. वर्षभरातच मीरा विश्वासराव यांच्या यु ट्युब चॅनल ८ हजार जणांनी सबस्क्राईब केलंय तर हजारो नेटिझन्स रोज त्यांचे व्हिडिओ पहात आहेत. यातून मीरा यांना आर्थिक उत्पन्नही मिळू लागलंय.. त्यांचा हा प्रयत्न प्रत्येक महिलेसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.