पुणे : MNS Rada in Pune : पुणे मनसेत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune MNS Rada) दरम्यान, हा वाद अयोध्ये दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकीदरम्यान उफाळून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकांना बोलावत नसल्याच्या रागातून शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर एकमेकांना भिडले. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असून कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. अयोध्ये दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकीदरम्यान हा वाद झाला आहे.



पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते भिडल्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. सभेबाबतची बैठक होती. यावेळी शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष आणि मनसैनिकामध्ये झटापट पाहायला मिळाली. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांचा मनसे कार्यालयात राडा झाला. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असून कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही, याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली.


पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व नेत्यासमोर हा वाद उफाळून आला. अयोध्ये दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हे भांडण झाल्याने मनसेत आलबेल चालल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अंतर्गवादामुळे मनसेची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.