Pune-Mumbai Expressway Accident: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरुन प्रवास करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढताना दिसत होते. पण यावर आता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले आहे. मागच्या सहा महिन्यांच्या आकडेवरीचा विचार केला तर अपघाताचे प्रमाण 20 टक्क्यांनी तर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने वेगवेगळ्या स्तरांवर काम केले. सहा महिन्यांत पुण्यासह रायगड, पिंपरी चिंचवड, पनवेल आरटीओच्या वायुवेग पथकाने २४ तास कारवाई केली. डिसेंबर 22 ते मे 23 दरम्यान अपघाताचे प्रमाण घटले आहे. सर्वांत जास्त कारवाई वेगाने धावणाऱ्या वाहनांवर झाली. 10 हजारांहून जास्त वाहने निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने धावताना आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.


ही आहेत कारणे


निर्धारित वेगाइतके वाहन चालविणे, लेन कटिंग न करणे, वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे आणि वेगाबद्दल चालकांचे होणारे समुपदेशन अशा विविध कारणांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांचे प्रमाण घटलेले पाहायला मिळाले. 


भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या


अपघातांचे घटलेले प्रमाण पुढीलप्रमाणे


पुणे-मुंबई महामार्गावर जानेवारी ते जुलै 2022 या कालावधीत एकूण 198 अपघात झाले होते. त्यातील 86 अपघातात जखमी झाले तर 109 अपघाती मृत्यू होते. 


जानेवारी ते जुलै 2023 या कालावधीत महामार्गावर एकूण 160 अपघात झाले. ज्यामध्ये  68 प्रवासी जखमी झाले तर 88 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. 


दरम्यान जुलै महिन्यात पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांचे प्रमाण  42 टक्क्यांनी घटले आहे. 


ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय