पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यामंध्ये जोरदार पाऊस बरसतोय. विविध जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळाही काही दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. पुण्यात येत्या 2 दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. (pune muncipal coroporation appeal to private company for give work to home her employees for 2 days due to heavy rain prediction)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाचा धोका लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने खासगी आणि आयटी कंपन्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीचा इशारा पाहता आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील 2 दिवसांसाठी (14 आणि 15 जुलै) वर्क टु होम देण्यात यावं, अस आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. पालिकेने याबाबत आदेश जारी केले आहेत. 


पुण्यात खासगी कंपन्यांसह हिंजवडी या आणि अनेक भागांमध्ये आयटी कार्यालयं आहेत. पावसात कर्मचाऱ्यांना ऑफिस गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा कर्मचाऱ्यांना जोरदार पाऊस झाल्याने ऑफिसमध्येच थांबावं लागतं. हवामान खात्याने पुण्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेने कंपन्यांना आवाहन करण्यात आलंय.