राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ संपन्न
सेवा परमो धर्म हे लष्कराच ब्रीद कायम आपल्या स्मरणात ठेवा हा संदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या कॅडेटस ना संबोधित करताना दिला.
पुणे: कॅडेटसचं दिमाखदार आणि शिस्तबद्ध संचलन... त्यानंतर कॅडेट्सनी केलेला जल्लोष उपस्थितांकडून त्यांना मिळालेली दाद आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या अधिऱ्यांनी केलेला आनंदोत्सव... अशा उत्साहात पुण्यातल्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३४ वा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. या दीक्षांत संचलन सोहळ्याला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती होती. देशातील तरुणांसाठी तुम्ही एक रोल मॉडेल आहात अस सांगत. सेवा परमो धर्म हे लष्कराच ब्रीद कायम आपल्या स्मरणात ठेवा हा संदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या कॅडेटस ना संबोधित करताना दिला.....
यावेळी अक्षत राज याला राष्ट्रपती सुवर्ण पदक, महंमद सोहेल याला राष्ट्रपती रौप्यपदक, अली महंमद चौधरी याला कांस्य पदक देऊन गौरविण्यात आलं.... आपल्या वडिलांकडून देश सेवेचा वारसा घेतलेल्या महंमद सोहेल आणि अली महंमद चौधरी या कॅडेट्स नी पुढे आर्मी इंफ्रंटरी मध्ये जाऊन देश सेवा करण्याचा मानस व्यक्त केला.