सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: 21 व्या शतकात विज्ञानाने (Science) एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर (Pregnancy) बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात (9 months Prenancy) जन्म होतो. तेव्हा अशा बाळांना अकाली जन्मलेली बाळं असं म्हणतात. अकाली जन्मलेले बाळं हे अन्य मुलांप्रमाणे खूप नाजूक असतं तसेच अनेक अशी बाळं असतात जी जास्त दिवस जगू शकतही नाहीत. त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असतं. साधारणपणे 7 व्या, 8व्या महिन्यात झालेली अकाली प्रसूतीची अनेक उदाहरणे सापडतात. मात्र 6 व्या महिन्यात प्रसुती होणं हे दूर्मिळ असतं. (pune news 6 months old baby born in pune parents expresses their reaction)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील वाकडं येथे राहणाऱ्या पवार कुटुंबियांची लेक 24 व्या आठवड्यातच म्हणजे 6 व्या महिन्यात अवघ्या 400 ग्राम वजनाची जन्मली आहे. तिचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिचं वजन हे दुधाच्या पिशवीपेक्षाही कमी होतं. आतापर्यंतची भारतात अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये वय आणि वजन (age and weight) दोन्ही बाबतीत ही मुलगी सर्वात लहान ठरली आहे. 


या मुलीचा जन्म गेल्या वर्षी 21 मे रोजी झाला तेव्हा तिच्या आईला प्रसुतीच 6 वा महिना होता. तिच्या आईला 3 ऱ्या महिन्यापासूनच पोटात त्रास सुरू झाला होता. तेव्हा त्यांनी चिंचवड येथील स्थानिक दवाखान्यात त्यांची तपासणी केली आणि तेथूनच त्यांच्यावर औषधोपचार सुरू झाले जेव्हा 6 वा महिना आला तेव्हा त्यांना खूप त्रास होत होता आणि जेव्हा रुग्णालयात त्यांना ऍडमिट करण्यात आलं तेव्हा त्यांच्या मुलीचा जन्म झाला. त्यांची मुलगी ही तेव्हा 400 ग्राम वजनाची जन्मलेली. जन्मल्यानंतर सूर्या मदर अँड चाइल्ड केअर (surya and child care) रुग्णालय येथे मुख्य निओनॅटोलॉजिस्ट डॉ. सचिन शाह यांच्या अंडर तिला 93 दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 23 ऑगस्ट रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी तिचे वजन 2130 ग्रॅम इतके होते. अशा बाळांमध्ये जगण्याचा दर 0.5% इतका कमी आहे. गर्भधारणेच्या (aboration) सामान्य 37-40 आठवड्यांनंतर जन्मलेल्या बाळांचे वजन किमान 2,500 ग्रॅम असते. पण ती आता इतर निरोगी नवजात मुलांसारखीच आहे आणि तिच्या जन्माच्या 7 महिन्या नंतर तिचे वजन 4.5 किलो आहे आणि तिचे चांगले पोषण होत आहे.


हेही वाचा - Viral : अ‍ॅब्यूलन्सचा खर्च परवडत नसल्यामुळे आईचा मृतदेह त्यानं खांद्यावरून नेला, शेवटी 'ते' आले मदतीला धावून


तिच्या जन्माच्या आधीपासूनच आम्ही सर्वकाही तयारी केली होता. आम्हाला एक मुलगा आहे आणि तो देखील नॉर्मल आहे. पण जेव्हा आमच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा आईला तिसऱ्या महिन्यातच त्रास सुरू झाला तेव्हापासून आम्ही डॉक्टरांचं सल्ला घेत होता आणि तिचा 6 व्या महिन्यात जन्म झाला तेव्हा तर मी दररोज डॉ. सचिन शाह (Dr. Sachin Shah) यांच्या सूर्या मदर अँड चाइल्ड केअर रूग्णालय येथे कौन्सिलिंगसाठी जात होतो आणि जेव्हा 93 दिवसांनी ती घरी आली तेव्हा आम्ही सर्वजण खूप खुश असून ती नॉर्मल आमच्या बरोबर खेळत आहे. मजा करत आहे आणि तीच पोषण देखील होत असल्याने आम्हाला खूप आनंद होत असल्याचं जन्मलेल्या मुलीच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे.