चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मवाळ: हल्ली जीवघेणे स्टंटबाजी (stunt) करणं सगळ्यांच्या जिवावर बेतत आहेत पण तरीही सोशल मीडियावरील (social media reels) रिल्सच्या हट्टापायी मात्र असे जीवेघेणे स्टंट्स करणं काही कमी होत नाहीये. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे रिल्स किंवा टिकटॉकवरील (videos) व्हिडीओज करण्याच्या हट्टापायी मात्र नुकत्याच एका मुलाचा थोडक्यात बचावला आहे. परंतु असा जीवघेणा स्टंट केल्यानं पोलिसांनी त्याच्यावर त्वरित कारवाई केली आहे. सध्या असे प्रकार तरूणांमध्ये (youngsters) वाढू लागले आहे. टीकटॉक सारखे प्रकार तरूणाईच्या जिव्हाळ्याचे झाले आहे. त्याच्यावर बंदीही करण्यात आली असली तरी इम्टाग्राम रिल्समुळे (insta reels) तरूणांमध्ये ही हवा काही कमी होण्याचं नावंच घेत नाहीये. आता या नव्या प्रकारानं पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे. (pune news a boy makes stunts for doing for social media police gets him)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे लोणावळा लोहमार्गावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या टिक टॉक हिरोंवर रेल्वे पोलीसांची कारवाई. देहूरोड ते बेगडेवाडी स्टेशन दरम्यान सोशियल मीडियावर व्हिडीओ वायरल करण्याच्या उद्देशाने हे दोघे रेल्वे रुळावर झोपून फोटो सेशन करत असताना रेल्वे पोलीसांना आढळून आले, लगेच चिंचवड रेल डिव्हिजन अंतर्गत देहूरोड रेल्वे पोलीस (police) दलाने तात्काळ या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून व्हिडीओ फोटो हस्तगत केले. अश्या प्रकारे स्टंटबाजी करून स्वतःची आणि रेल प्रवाश्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या दोघांना पोलिसांनी (hero) चांगलाच चोप देत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. 


हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना


पाहा व्हिडीओ : 



काय घडला प्रकार :


या दोघांना माननीय रेल्वे कोर्टाने प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला तसेच पुन्हा असं धाडस करू नये असा इशारा रेल प्रशासनाने दिलाय. विक्रम राठोड आणि महेश रबारी अशी दोघांची नावे तर सीआरपीएफ पोलीस निरीक्षक अमित कुमार यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच रेल्वे हद्दीत या प्रकारे टिकटॉक , इस्टाग्राम, फेसबुक,द्वारे जर कोणी आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा रेल पोलीस दलाने दिला आहे.