कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : आळंदीमध्ये (Alandi) वाहतूक कोंडीमुळे (Traffic) एका 21 वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला आहे. आळंदी पोलीस ठाणे (Alandi Police) ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर बेकायदेशीर रहदारीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याच वाहतूक कोंडीमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स (Ambulance) अडकल्याने त्यामध्ये असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात रविवारी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उज्वला नामदेव झाडे (21) असं मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. उज्वला ही आंब्याच्या झाडावरून पडून जखमी झाली होती. उज्वला घराच्या झाडातून गॅलरीतून आंब्याच्या झाडावरुन आंबे काढत होती. त्यावेळी तिचा तोल गेला आणि झाडावरुन खाली पडली. उंचावरुन पडल्यामुळे उज्वलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र रस्त्यावरील बेकायदेशीर रहदारीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याच वाहतूक कोंडीमुळे उज्वलाला नेण्यात येत असलेली रुग्णवाहिका 20 ते 25 मिनीटे रस्त्यावरच अडकून पडली. 


यानंतर गंभीर जखमी झालेल्या उज्वलाला घेऊन रुग्णवाहिका आळंदी ग्रामीण रुग्णालयात पोहोचली. मात्र डॉक्टरांनी  तिच्यावर उपचार करण्याआधी उज्वलाचा मृत्यू झाला होता. तिला आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणले जात होते मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उज्वलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दुसरीकडे आळंदी पोलीस स्टेशन परिसरातून रुग्णालयाकडे जातान उज्वलाचा श्वासोश्वास  सुरू होता. मात्र रुग्णवाहिका जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने उज्वलाचा मृत्यू झाला, असा दावा तिच्या नातेवाईकांनी दिली.