पुणे : राज्यात रविवारी नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने विक्रम गाठला आहे.  राज्यात एका दिवसात तब्बल 30 हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. 
 
तर मुंबईतचा आकडा तीन हजारापलीकडे गेला. आता पुण्यातदेखील रविवारी विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. 
 
पुण्यात काल दिवसभरात 2 हजार 900 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर , 20 रुग्णांचा मृत्यू झाला.  
 
शहरातील एकूण बाधितांची संख्या अखेर 2 लाख 35 हजार 394 झाली आहे. आजपर्यंत 5 हजार 53 रूग्णांचा मृत्यू झाला. 
 
राज्यात आता करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असल्याची परिस्थिती आहे. त्यात पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.