Pune Breaking news : ससूनच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला डॉक्टरने मारली उडी, परिसरात एकच खळबळ
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिला डॉक्टरने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून जीव संपविण्याचा प्रयत्न केला आहे. (Breaking news)
Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरून एका महिला डॉक्टरने उडी मारली आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. त्या महिला डॉक्टरवर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरची ओळख अद्याप पटली नाही. घटनेनंतर बंडगार्डन पोलीस आणि ससून रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या महिला डॉक्टरने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अजून काही स्पष्ट झालेलं नाही. (Pune News female doctor jumped from the third floor of sassoon hospital Breaking news in marathi )