First Mango Of The Season In Pune: लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना आवडणारे फळ म्हणजे आंबा. फळांचा राजा असंही आंब्याला म्हणतात. कोकणातील आंब्याला देश-विदेशातून मागणी आहे. हापूस, देवगड हापूस आणि केसरी आंब्याची चव अनेकांना भुरळ घालते. त्यामुळं या जातीच्या आंब्यांना हंगामात अधिक मागणी असते. म्हणूनच त्यांची किमतीही हजारोच्या घरात आहेत. अलीकडेच पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या पेटीचा भाव एकून तुम्हीही थक्क व्हाल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली असून. ही हंगामाती पहिली पेटी दाखल झाली आहे. तर पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीची किंमत 21 हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे. आंबा हे फळ सर्वांचेच आवडते आहे. याला फळांचा राजा म्हणतात. पिकलेला आंबा एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आज दाखल झाली या पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत 21,000 रुपये होती


पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधीवत पूजा आज पार पडली आहे. यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे. आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी 21 हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत.


पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आली होती.


नवी मुंबई येथेही आंबा दाखल


यंदाचा पहिला हापूस आंबा एपीएमसी फळ बाजारात दाखल झाला असून व्यापारी अमोल शिंदे यांच्या गाळ्यावर यावर्षीचा पहिला आंबा आला आहे. रत्नागिरीतून आंब्याच्या दोन पेट्या दाखल झाल्या आहे. या आंब्याची विधिवत पूजा करण्यात आली. आंब्याच्या पेटीला 10 ते 15 हजार रुपये इतका दर मिळाला आहे. दरम्यान, यंदा आंबे खवय्यांसाठी खुशखबर आहे. यांदा आंब्याचे मुबलक उप्तादन झाले असून लवकरच आंब्याची आवक वाढणार आहे.