पुणेः प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार, नंतर तरुणीच्या कृत्याने सारेच हादरले
Pune News Today: प्रियकराने लग्नास नकार देत तुला जे करायचे ते कर,असे म्हणत मानसिक त्रास दिल्याने प्रेयसीने तिच्या मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
Pune Crime News Today: पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात धक्कादायक घटना घडत आहेत. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने टोकाचा निर्णय घेतला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेत प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील ऊरळी देवाची येथे शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी सकाळी एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतिक्षा दत्तात्रेय भगत (वय १९, रा. राजुरी, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रियकर आदित्य अशोक जाधव (रा. राजुरी, ता. पुरंदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य आणि प्रतिक्षा दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. दोघांचीही मैत्री होती त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रतिक्षा त्याच्यासोबत लग्नाची स्वप्न रंगवू लागली. मात्र, आदित्याच्या मनात दुसरेच होते.
विवाहाचे आमिषाने प्रतिक्षाला घेऊन आदित्य गावातून पसार झाला होता. त्यानंतप प्रतिक्षाने त्याला लग्नाबाबत विचारणा केली होती. तेव्हा त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, प्रतिक्षा सातत्याने त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावत होती. तेव्हा त्याने लग्नास नकार दिला. आदित्यने घरातून पळवून आणल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने प्रतिक्षा पुरती कोलमडली होती. त्यानंतरही तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तुला जे करायचे ते कर, असं तिला म्हणाला होता.
आदित्यने लग्नाला नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या प्रतिक्षाने मानसिक त्रास सहन न झाल्याने हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकरावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.