Pune Crime News: बाप-लेकीचे नाते खूप हळवे आणि खूप स्पेशल असते. बापाच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज लेकीला लगेच येतो. पण पुण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. बापानेच पोटच्या लेकीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


वडिलांनीच केली मुलीची हत्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघोली तालुक्यातील हवेली येथे वडिलांकडून मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्षदा फकीरा दुपारगुडे वय वर्ष १५ असं हत्या झालेल्या या मुलीचे नाव आहे. सध्या ही मुलगी वाघोली येथे राहत होती. पण त्यांचे मुळं गाव सोलापूर येथील आहे.


मुलीच्या डोक्यावर व हाता-पायावर कुऱ्हाडीचे वार


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्मदात्या बापानेच स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यात हातावर, पायावर वार करत गंभीर जखमी केले. मुलीवर वार करत निर्दयी बाप तिथून फरार झाला होता. मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तिला लगेचच उपचारांसाठी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. जन्मदात्या वडिलांनीच मुलीची हत्या का केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. 


पोलिसांकडून गुन्हा दाखल 


या प्रकरणात पीडित मुलीच्या मावशीच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत. वडिलांनी मुलीची हत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पण वडिलांनी मुलीबाबत इतकं कठोर पाऊलं याची चर्चा होत आहे.