सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: आजकाल कुठेही आपल्याला सुरक्षिततेची हमी देता येत नाही कारण सध्याच्या जगात अनेक चित्रविचित्र घटना (shocking news today) घडलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यातूनच परक्या लोकांपेक्षा हल्ली जवळच्या लोकांवरचाच अनेकांचा विश्वास उडाला आहे असं म्हटलं तर खोटं ठरू नये कारण असाच एक धक्कादायक प्रकार (pune crime news) पुण्यात घडलेला पाहायला मिळाला आहे. आपल्या सख्ख्याच मुलानं व सुनेनं आपल्या जन्मदात्या आईची फसवणूक (mother in law looted) केली आहे. हिंदी-मराठी मालिकांमध्ये (hindi - marathi serials) दाखवलं जातं त्याप्रमाणे सध्या अनेक गुन्हेगारीचे प्रकार पाहायला मिळत आहेत. सध्या पैसा हा सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे आजकाल लोकांच्या पैशांची फसवणूकही केली जाते आहे. अशा परिस्थितीत आपल्याला परक्या लोकांसोबतच काय पण आपल्या आप्तांशीही कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. (pune news son and wife looted mother for 46 lakhs rupees mother son relationship daughter in law)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:च्या आईची मुलगा व सुनेने तब्बल 46 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.न्यायालयीन कामकाजासाठी सह्या लागत असल्याची बतावणी करून त्यांच्या खात्यातील 46 लाख रुपयांची रोकड काढून घेतली. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रारणी 82 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस (mumbai police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बाळासाहेब मारूती टिळेकर, मिलिंद मारूती टिळेकर यांच्यासह तीन महीलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला मुंढव्यातील केशवनगर भागात एका वाड्यात एकट्याच राहतात. त्यांना चार मुले आहेत. 


काय घडला प्रकार? 


ज्येष्ठ महिला (senior citizens and frauds) लहान मुलाकडे राहायला होत्या.तर त्यांची तीन मुले विचारपूस करत नव्हती. दरम्यान,आईला माहेरहून पैसे मिळणार असल्याची कुणकुण मुलगा बाळासाहेब,मिलिंद व त्यांच्या सूनांना लागली.त्यानंतर त्यांनी दोघानी आईशी गोड बोलून तिचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला. मोठ्या मुलाने त्यांना त्याच्या घरी राहण्यास ही नेले.दरम्यान, एप्रिल 2012 मध्ये न्यायालयाच्या आदेशाने वडिलांच्या मिळकतीचे 60 लाख रुपये त्यांच्या आईच्या बँक खात्यात जमा झाले. त्या वेळी मुलांनी न्यायालयाच्या बाहेर आईच्या सह्या कागदपत्रांवर घेतल्या. 2015 मध्ये ज्येष्ठ महिलेला हदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात पैसे भरण्यासाठी त्यांनी बँकेतून अडीच लाख रुपये काढले. तेव्हा बँक खात्यातून परस्पर 46 लाख रुपये काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलांना पैशांबाबत विचारणा केली, तेव्हा मुलांनी त्यांच्यावरच अरेरावी केली. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


धावत्या एक्सप्रेसमध्ये दरोडा


मंगळवारी पहाटेच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकात ही एक्सप्रेस थांबली (running train) असता याच वेळेस दहा ते पंधरा दरोडेखोर या एक्सप्रेसच्या S1 आणि S2 या भोगीमध्ये शिरले.त्यांनी प्रवाशांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटायला सुरुवात केली. तब्बल एक तास त्यांच्याकडून ही लूट सुरू होती. याचवेळी काही धाडसी प्रवाशांनी रेल्वे कंट्रोल रूमला या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून यातील आठ दरोडेखोरांना (crime news today) ताब्यात घेतले. यातील सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून दोन दरोडेखोर हे अल्पवयीन आहेत .दरम्यान हे सर्व दरोडेखोर औरंगाबाद परिसरातील असल्याची माहिती मिळते आहे. यापूर्वी देखील धावत्या एक्सप्रेस मध्ये दरोडा टाकण्याचे असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचा वातावरण आहे.