पुणे : पुण्यातील लोणी काळभोर इथं एक दुर्देवी घटना समोर आली आहे. शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले. यात  चारही जणांचा गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेंद्र जयसिंग काळभोर यांचे प्यासा हॉटेलच्या मागीलबाजूस जय मल्हार कृपा बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या शौचालयाची टाकी उपसण्याचे काम सुरू होते. त्यावेळी साफ करणारी एक व्यक्ती टाकीत पाईप टाकताना तोल जावून पडली. या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेले तीघही या टाकीत पडले. गुदमरुन या चौघांचा मृत्यू झाला.


सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा जाधव आणि रुपेश उर्फ सुवर्ण कांबळे अशी मृतांची नावं आहेत. हे चारही जण कदमवस्तीत रहाणारे होते. सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


 


 


या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.