Pune Water Cut News :  पाणीपुरवठा बाबत महत्त्वाची बातमी आहे. पुणेकर (Pune news) तुमच्यावर पाणी संकट असणार आहे. एकीकडे राज्याला अवकाळी पावसाने (Maharashtra Weather Update) वेठीस धरलं आहे. दुसरीकडे पुण्यात दोन दिवस पाणी कपात (pune news) करण्यात येणार आहे. मार्च महिन्या संपायला आल्या भर उन्हात पावसाने (Mumbai Rains) जोरदार हजेरी लावली आहे.  त्यात पुण्यात गुरुवारी पाणीकपातीचं संकट असणार आहे. तर पुणेकर पाणी जपून वापरा.


कधी नसणार पाणी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाणीपुरवठा येत्या गुरुवारी 23 मार्चला 2023 नळाला पाणी येणार नाही आहे. तर शुक्रवारी 24 मार्च 2023 ला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असं पुणे महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे. (pune news Water Cut on thursday 23 March which areas will the water supply be shut off in marathi)


'या' कामासाठी पाणीपुरवठा बंद


पुणे महानगरपालिकेने चिखली जलशुद्धीकरण केंद्रावर काम हाती घेतलं आहे. या केंद्रावर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. पर्वती ते एसएनडीटी दरम्यानच्या अस्तित्वातील 1 हजार 200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून होणारी गळती रोखण्यासाठी गुरुवारी काम करण्यात येणार आहे. शिवाय चतु:श्रृंगीमधील पाण्याच्या टाकीची वाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडण्याचं कामही करण्यात येणार आहे. 


'या' परिसरात येणार नाही पाणी


औंध
बोपोडी
औंध रस्ता
अभिमानश्री सोसायटी
विधाते वस्ती
आयटीआय रस्ता
पंचवटी
कस्तुरबा वसाहत
सिद्धार्थनगर
औंध गाव
पुणे विद्यापीठ परिसर
भाऊ पाटील रस्ता
बाणेर रस्ता परिसर
भोईटे वस्ती
सिंध सोसायटी
सानेवाडी
आनंद पार्क
आयसीएस काॅलनी भोसले नगर
इंदिरा वसाहत
सकाळ नगर
अनगळ पार्क
गणेश नगर बोपखेल
म्हस्के वस्ती
आळंदी रस्ता
टिंगरेनगर
आदर्श कॉलनी
बर्माशेल झोपडपट्टी
पुणे विमानतळ
लोहगांव
राजीव गांधी नगर
विमाननगर
यमुनानगर
श्रीपार्क सोसायटी
दिनकर पठारे वस्ती
ठुबे पठारे नगर
खराडी बाह्यवळण रस्ता