क्रिकेटवर सट्टा लावणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक
क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी : क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे.
'तामिळनाडू प्रीमिअर लीग' या क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावल्या प्रकरणी जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे. निगडी पोलिसांनी जावेद शेख यांच्यासोबतच पाच जणांना अटक केली आहे.
सट्ट्यासाठी वापरण्यात आलेला लॅपटॉप, मोबाइल आणि काही रोख रक्कम असा एकूण २ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चिखली येथील मित्तल इमारतीमध्ये एका फ्लॅटमध्ये सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.
सट्टा लावल्याप्रकरणी पोलिसांनी या पाचही जणांना अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.