COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुणेकरांना पुणे शहरात १५ ठिकाणी मोफत वायफाय सुविधा देण्यात येणार आहे, २६ जानेवारीपासून ही सुविधा देण्यात येणार आहे, स्मार्टसिटी अंतर्गत ही सुविधा देण्यात येणार आहे. 


स्मार्टसिटी अंतर्गत फ्री वायफाय


काही ठराविक ठिकाणी सुरूवातीला ही सुविधा देण्यात येणार आहे. पुणे महापालिकेकडून ही सुविधा असणार आहे. पुण्यात तरूणांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे.


मुख्य गरजेच्या १५ ठिकाणी ही सुविधा


इंटरनेट-वायफाय ही प्रत्येकाची गरज झाली आहे. मुख्य गरजेच्या १५ ठिकाणी ही सुविधा असणार आहे, प्रत्येकाला ५० एमबी डेटा दिवसाला वापरता येणार आहे. इंटरनेचा स्पीड ५१२ केबीपीएस असणार आहे.


किती नागरिकांकडून होणार वापर


मोबाईल कंपन्यांनी अतिशय स्वस्तात मोबाईल इंटरनेट डेटा देण्यास सुरूवात केली असताना, या सेवेचा किती नागरिक लाभ घेतात हे दिसून येणार आहे, दुसरीकडे ही ठिकाणं कोणती असतील ते देखील महत्वाचे ठरणार आहे.