Pune Crime News : शिक्षणाचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर अशी पुण्याची ओळख आहे. मात्र, याच पुण्यात अनेक विचित्र प्रकार घडत आहेत. पुण्यातील एका नामांकित  मॉलमध्ये असलेल्या एका स्पा सेंटरमध्ये भलतेच उद्योग सुरु होते. पोलिसांनी छापेमारी करत या स्पा सेंटवर कारवाई केली. अनेक मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. मानवी तस्करी  प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. छापा टाकण्यात आलेल्या स्पा महिला मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. निगडीतील फिनिक्स स्पा वर ही कारवाई करण्यात आली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतल्या इन्स्पिरिया मॉलमध्ये फिनिक्स नावाने सुरू असलेल्या स्पामध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. तरुणींना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांनी फोनिक्स स्पामध्ये डमी ग्राहक पाठवला, तिथे वेश्याव्यवसाय केला जातो का, याची शहानिशा केली. स्पावर छापा टाकण्यात आला. या प्रकरणी चार तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिला मॅनेजर ला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून फरार आरोपी दिनेश गुप्ता चा पोलीस शोध घेत आहेत.


कोयता गँगला चाप लावण्यासाठी पुणे पोलीस ऍक्शन मोडवर 


पुण्यातील कोयता गँगची आता काही खैर नाही, कोयता गँगला चाप लावण्यासाठी पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. यापुढे अल्पवयीन मुलं कोयता घेऊन दहशत माजवता दिसल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाईल असा इशारा पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी दिलाय. पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्या साठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी कोयता गँगविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


लाच मागणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ अटक


शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या तलाठी ला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यावर ही कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे सोमवारी पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. सखाराम कुशाबा दगडे असे लाच स्वीकारलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
40 वर्षीय व्यक्तीच्या शेताच्या गटाची फोड केली. त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घ्यायची होती. त्यासाठी तलाठी दगडे यांनी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. यातील पहिला हप्ता २५ हजार रुपयांचा असेल असे ठरले. या संदर्भात तक्रारदाराने तक्रार केली आणि काल लाच लुचपत विभागाने सापळा रचत दगडे यांना ताब्यात घेतले.