खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवून १४ लाखांची खंडणी
खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवून एका व्यावसायिकाला ओलीस ठेवून त्याच्याकडून १४ लाख ३० हजारांची खंडणी
पुणे : खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवून एका व्यावसायिकाला ओलीस ठेवून त्याच्याकडून १४ लाख ३० हजारांची खंडणी उकल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. पोलिसांनी या प्रकरणी ५ आरोपीना अटक केलीय. विजय नवघणे, उत्तम भामे, गौतम कांबळे, प्रदीप वाघ आणि विशाल शेलार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यातील विजय नवघणे हा फिर्यादीचा ड्रायव्हर असून गुन्हयात त्याचा महत्वाचा सहभाग आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा दडपण्यासाठी २ पोलिसांनी लाच घेतल्याचा प्रकारही समोर आलाय. त्या पोलिसांवरदेखील स्वतंत्रपणे कारवाई करण्यात आलीय.
३ लाख जप्त
अटक आरोपींकडून ३ लाख ८४ हजारांची रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट्स तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेलं बनावट पिस्तूल जप्त करण्यात आलय.