भीमा कोरेगाव दंगल : आरोपींचा नक्षलवाद्यांशी संबंध - पुणे पोलीस
पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा सहभाग होता, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी देशभरात छापे टाकून काल पाच जणांना अटक करण्यात आली.
नक्षल्यवाद्यांशी संबंध असलेले सबळ पुरावे - पोलीस
नागपूर, मुंबई आणि दिल्लीतून रिपब्लिकन पॅंथरचे सुधीर ढवळे, नक्षल चळवळीतल्या आरोपींचं वकीलपत्र घेणारे वकील सुरेंद्र गडलिंग, निवृत्त प्राध्य़ापिका शोमा सेन, महेश राऊत, नक्षल्यांचा म्होऱक्या साईबाबा याचा निकवर्तीय़ रोना विल्सन यांना अटक करण्य़ात आलीय. या सगळ्यांचे नक्षल्यांशी संबंध असलेले सबळ पुरावे मिळाले, या सगळ्यांचा नक्षलवाद्याच्या वरिष्ठांशी संबंध असल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळालेत.
कोणा कोणाला झाली अटक ?
सुरेंद्र गडलिंग
# ऍडव्होकेट गडलिंग हे नक्षलवाद्यांचे वकील पत्र घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत
# जी एन साईबाबा, सुधीर धावले, महेश तिरकी, हेम मिश्रा, प्रशांत राही या नक्षल चळवळ समर्थकांचे वकील पत्र सुरेंद्र गडलिंग यांच्याकडे आहे
# ९४-९५ मध्ये चंद्रपूर मधील wcl ट्रेड युनियन मध्ये सक्रीय होते
# भूमिगत असलेला व पोलिसांना wanted नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याच्यासोबत ट्रेड युनियन मध्ये कार्य केले
# कट्टर डाव्या विचारसरणीचे
सोमा सेन
# नागपूर विद्यापीठात इंग्रजीच्या सहायक प्राध्यापिका
#कट्टर डाव्या विचारसरणीच्या
# नक्षलवाद्यांच्या उघडपणे समर्थन करणाऱ्या
# पती तुषारकांत भट्टाचार्य यांना काही महिन्यापूर्वी गुजरात पोलिसांनी अटक केली
# नक्षल चळवळीशी संबंधामुळे पोलिसांच्या रडार वर
महेश राऊत
# TISS चा विद्यार्थी
# PM Rural Fellowship अंतर्गत महेश राउत याने गडचिरोलिच्या दुर्गम भागात काम केले
# तिथेच डाव्या विचारसरणीशी ओळख
# काही वर्षपूर्वी गडचिरोली पोलिसांनी ताब्यातही घेतले होते
# २०१३ मध्ये गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात नक्षल समर्थक निधी गोळा करीत असताना महेश राउत उपस्थित होता त्यामुळे तो पोलिसांच्या रडार होता
सुधीर ढवळे
सुधीर ढवळे हे आंबेडकरी चळवळीतले एक कार्यकरते आहेत. ते विद्रोही या द्वैमासिकाचे संपादक आहेत. रिपब्लिकन पँथर्स जातीअंताची चळवळ या संघटनेचे राज्य संघटक आहेत. तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान या 250 संघटना असलेल्या सामाजिक आघडीचे राज्य समन्वय समितीचे सदस्य आहेत. फुले- आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी जातीय अत्याचारांच्या विरोधात कायम दलित-पिडीत जनतेच्या बाजूने आवाज बुलंद केला आहे.
2011 मध्ये त्यांना UAPA या कायद्याची कलमं टाकून बेकयदेशीरपणे अटक केली होती. गोंदिया सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष म्हणून मुक्तता केली होती.
रोना जैकब विल्सन
# JNU माजी स्टूडेंट
# कम्युनिस्ट पार्टीच्या स्टूडेंट विंग मध्ये सक्रिय
# जी एन साईंबाबा व हेम मिश्राला जी अटक झाली त्याविरुद्ध आन्दोलन करण्यात समोर
# कट्टर डाव्या विचारसरणीचा