पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...
महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.
Pune Crime : पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवर सायरन आणि सर्च लाईट बसवले जाणार आहेत. यामुळे संकट समयी पोलिसांना तात्काळ याची सूचना मिळणार आहे. बोपदेव घाटातील प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा... मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन
बोपदेव घाटात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता "सर्च लाईट" बसवण्यात येणार आहे. शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे. सायरनच्या मदतीने तसेच सर्च लाईटच्या मदतीने पोलिसांना तात्काळ सूचना मिळणार आहे. यामुळे संकट समई तात्काळ मदत पोहचवणे शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते. यानंतर पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू होणार आहे.
विद्येचा माहेरघर असलेले पुण्यामध्ये 21 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली . तरुणी मित्रासोबत बोपदेव घाट गेली असता तरुणीच्या मित्राला झाडाला बांधून दोघांना मारहाण करून तरुणीवर अज्ञात तरुणांनी सामूहिक बलात्कार केलाय . पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार त्या घटनेला 48 तास लोटून गेलेत मात्र अजूनही पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं नाही.. तिन संशयीत आरोपींचा सीसीटीव्ही समोर आला होता.. मात्र अजूनही त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये.. बोपदेव घाटात रात्री 21 वर्षी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता.. आतापर्यंत 200 जणांची चौकशी पोलिसांनी केलीय.. कोयता, बांबू , धारदार शस्त्र हातात घेऊन आरोपींनी दोघांना धमकावून तरुणीवर अत्याचार केला होता..