पुण्यात धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात पोलीस अधिकारी नतमस्तक, व्हिडिओ झाला व्हायरल
पुण्यात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांचा दिव्य दरबार आयोजित करण्यात आला आहे. या दरबारात चक्क पुणे पोलिसातील एक अधिकारी बागेश्वर बाबांसमोर नतमस्तक होत आपली व्यथा मांडली. याचा व्हिडि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Pune Bageshwar Baba : पुण्यात पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून 21 नोव्हेंबरला दिव्य दरबार तर 22 नोव्हेंबर रोजी होणार हनुमान कथा सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात पुणे पोलिसातील एक अधिकारी हजर होता. बागेश्वर बाबांसमोर हा पोलीस अधिकारी नतमस्तक झाला तसंच बाबांसमोर या अधिकाऱ्याने आपली व्यथा मांडली. कार्यक्रमस्थळी बंदोबस्तावर हा पोलीस अधिकारी होता. बाबांसमोर नतमस्तक होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमावरुन वाद
भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमांला अजित पवार गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला. जगदगुरु संत तुकराम महाराजांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही, अशी पोस्ट अजित पवार गटाट्या राष्ट्रवादीने टाकलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून विरोध केलाय. या पोस्टमुळे सत्तेत असलेल्या अजित पवार गाट आणि भाजपमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे.
अंनिसचं आव्हान
बागेश्वर धाम सरकारच्या दिव्य दरबारला अंधश्रद्धा निर्मुलन समितीने विरोध केला आघे. दरबाराच्या माध्यमातून अशास्त्रीय , अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं, असा आरोप अंनिसने केला आहे. तसंच बाबांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाी केली जावी अशी मागणीही अंनिसने केली आहे. बागेश्वर बाबा करत असलेले चमत्काराचे दावे त्यांनी वकील, पोलीस, तज्ज्ञांसमोर सिद्ध करावेत त्यांना 21 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असं आव्हानही अंनिसने दिलं आहे.