कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (pimpri chinchwad police) उपनिरीक्षकाला (PSI) ड्रीम 11वर (Dream11) दीड कोटींचं बक्षीस लागलं आहे. त्यामुळे या पोलीस उपनिरीक्षकाचे नशीब पालटल आहे. सोमनाथ झेंडे असं त्यांचं नाव असून ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत असतात. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड (Ban vs Eng) या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती. दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे ड्रीम 11मुळे अनेकजण देशोधडीला लागल्याचे चित्र असताना पिंपरी चिंचवडमधील या पोलीस उपनिरीक्षकाने तब्बल दीड कोटींचं बक्षीस जिंकलं आहे. उपनिरीक्षकाला मिळालेल्या या बक्षिसाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. एकीकडे विश्वचषक सुरु असून अनेकजण ड्रीम 11वर टीम तयार करुन पैसे लावत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाने देखील अशीच ड्रीम 11वर टीम लावली आणि दीड कोटी रुपये जिंकले आहेत.


पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना हे बक्षीस लागलं आहे. सोमनाथ झेंडे हे पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती अशी माहिती उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी दिली. सध्या सुरु असलेला विश्वचषक आपण नियमितपणे पाहत असून क्रिकेटची आवड असल्याचे सोमनाथ झेंडे यांनी सांगितले.


इतरांप्रमाणे नशीब आजमवण्यासाठी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्याआधी उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी 49 रुपयांत ड्रीम 11 वर आपला संघ बनवत दीड कोटी रुपये मिळवले आहेत. दीड कोटींचे बक्षीस लागल्यानंतर सोमनाथ झेंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून ड्रीम 11 यावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्यावर टीम लावली होती. त्यात दीड कोटींचे बक्षीस मिळाले आहे, असे झेंडे यांनी सांगितले. सुरुवातीला माझा यावर विश्वासच बसला नाही. पण, नंतर याचे दोन-दोन लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे खरे असल्याची खात्री पटली असेही सोमनाथ झेंडे म्हणाले.