Gautami Patil Viral Video: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल (Viral Video) झाला होता. गौतमी पाटीलचा कपडे बदलानाचा हा व्हिडीओ असल्याने राज्यात खळबळ माजली होती. दरम्यान याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) एकाला ताब्यात घेतलं आहे. हा मुलगा अल्पवयीन असून नगर जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतमी पाटीलचे संपूर्ण राज्यभरात कार्यक्रम होत असतात. तिच्या लावणीच्या कार्यक्रमांना प्रचंड मागणी असते. मात्र लावणी सादर करताना अश्लील डान्स आणि अश्लील हावभाव यामुळे तिच्यावर प्रचंड टीका होत असते. अनेक राजकीय नेत्यांनीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना विरोध केला आहे. त्यातच पुण्यात 24 फेब्रुवारीला गौतमी पाटीलचा एका कार्यक्रम पार पडला होता. पण हा कार्यक्रम गौतमी पाटीलच्या लावणीऐवजी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. 


गौतमी पाटीलचा या कार्यक्रमात एका अज्ञात व्यक्तीने कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट केला होता. इतकंच नाही तर हा त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली होती. गौतमी पाटीलसह नृत्य करणाऱ्या एका मुलीने याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसंच राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली होती. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसंच सायबर पोलिसांकडेही याची तक्रार दाखल आहे. 


तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला होता. पण अखेर दोन महिन्यांनी पोलिसांना यश मिळालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अल्पवयीन मुलगा असल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याने हा व्हिडीओ व्हायरल केला होता. नगर जिल्ह्यातील एका शहरातून या मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. यामध्ये अन्य कोणाचाही सहभाग आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत.


गौतमीला झाले होते अश्रू अनावर


या व्हिडीओवर गौतमीने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले होते. "मी खूप गोष्टींचा सामना केला आहे. हा व्हिडीओ ज्याने काढला असेल त्याच्या घऱात आई-बहिणी नसतील असं वाटतं. तो एकटाच जन्माला आला असेल. कुठून जन्माला आला असेल माहिती नाही. त्यामुळेच त्याने हा कांड केला असेल," अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.