Pune Accident News:  पुणे हिट अँड रन प्रकरणात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) गप्प का ? शरद पवार गटाकडून या प्रकरणात कोणती प्रतिक्रिया का येत नाही ? अगरवाल आणि पवार कुटुंब यांचे काय संबंध आहेत काय?  आरोपीला दिलेला वकील पवार कुटुंबियांच्या घनिष्ट संबंधांतील असल्याची माहिती मिळेते आहे, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. अग्रवाल याला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे का ? असा सवालही नितेश राणे यांनी विचारलाय.  एरव्ही सर्व प्रकरणी आवाज उठविणाऱ्या आणि राजीनामे मागत फिरणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत व्यक्त व्हावे अशा शब्दात नितेश राणे यांनी सुनावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांचं उत्तर 
नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.  नितेश राणे यांनी टीव्ही पाहिला नाही का, काल आपण बारामतीत होतो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी राजकीय दबावात येऊ नये असं म्हटलं, पण राजकीय दबाव कोण टाकत आहे? कोणी फोन केला? कोणामुळे बेल मिळाली? हे समोर यायला हवे असे सवाल उपस्थित करत राजकीय दबाव सत्ताधारी करू शकतात असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केलाय.


300 शब्दात निबंध लिहा ही चेष्टा आहे, हे असंवेदनशील सरकार आहे. रोड सेफ्टी बद्दल कोणीच बोलत नाही. माझा आरोप आहे हा मोठा गुन्हा आहे ज्यांनी फोन केला असेल ते ही समोर आले पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलीय. घटना घडल्यानंतर जे आमदार पोलीस स्टेशनला गेले होते त्याचं उत्तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. आरोपी मुलाचं आयकार्ड का तपासलं नाही. 17 वर्षांच्या मुलाला दारू देता कशी? त्याला कार चालवायला देता कशी? असे सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेत.


पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक माहिती
पुण्याच्या कल्याणीनगर अपघातातील पोर्शे कारमध्ये (Porsche) तांत्रिक बिघाड होता. असं असतानाही विशाल अग्रवालने ती गाडी मुलाच्या ताब्यात दिल्याची बाब उघड झालीय. इतकंच नाही तर.. 'मुलानं कार चालवायला मागितली तर त्याला चालवू दे.. तू बाजूला बस' अशी सूचना विशाल अग्रवालनं त्याच्या चालकाला दिली होती, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय. विशाल अग्रवाल हे अपघातात आरोपी असलेल्या मुलाचे वडील आहेत. त्यांना बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी युक्तिवाद करताना सरकारी पक्षाच्या वतीने विशाल अग्रवालच्या विरोधात बाजू मांडण्यात आली.