Pune Porsche Car Accident : पुण्यातलं ससून रुग्णालाय (Sassoon Hospital) पुन्हा वादा अडकलं आहे. ससून रुग्णालयातल्या डॉक्टर्सनी तीन लाखांच्या बदल्यात पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचं ब्लड सँपल (Blood Sample) बदललं. या डॉक्टर्सची चौकशी करण्याची जबाबदारी जे.जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळेंकडे (Dr. Pallavi Saple) सोपवण्यात आली आहे. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून यात डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौकशी समितीच आरोपीच्या सापळ्यात
ससूनच्या डॉक्टर्सची चौकशी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच आता आरोपांच्या सापळ्यात अडकल्या आहेत.  डॉ. सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी, यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वी केला होता. यावर चौकशी समिती नेमण्याचे सरकारने विधानसभेत घोषणाही केली होती. ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणे म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणारे आहे. ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी.  अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलीय.


पल्लवी सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप
जे.जे.च्या डीन असणाऱ्या पल्लवी सापळेंवर याआधीही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत. औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर कमिशन घेतल्याशिवाय सही करत नसल्याचा आरोपी यामिनी जाधव यांनी केला होता. याशिवाय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना परवानगीशिवाय रक्तातील प्लाझ्मा विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. प्लाझ्मा विकून मिळालेल्या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करुन ती आईने दान दिल्याचं सांगितलं. जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना धमकावल्याचा आरोपही पल्लवी सापळेंवर आहे.


पल्लवी सापळे यांनी मात्र आरोपांवरच्या प्रश्नाचा चेंडू सरकारच्या कोर्टात ढकललाय. एकंदर पुणे अपघात प्रकरणात ब्लड सँपल बदलल्याप्रकरणी चौकशी समितीच संशयाच्या फेऱ्यात अडकलीय. त्यामुळे चौकशी समितीच्या अध्यक्षा असलेल्या सापळेंना बदलण्याची मागणी होतेय. 


ससून रुग्णालयातील शिपाई ताब्यात
ससून हॉस्पिटलमधील शिपाई अतुल घटकांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटकांबळेने डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यातील संवादाचे काम केलं. अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी लागणारा मोबदला किती आणि तो कसा द्यायचा, हे घटकांबळे ने या दोघांशी बोलवून ठरवलं होतं. डॉक्टर तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या वेतिरिक्त आणखी तिसऱ्या व्यक्तीचा या प्रकरणात संबंध आहे का? हे तपासण्यासाठी पुणे गुन्हे शाखेकडून घटकांबळेची कसून चौकशी केली जातीये.