Pune Porsche Accident: पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एक अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांचे रक्त नमुने बदलण्याच्या गुन्ह्यात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या कल्याणनगर येथे एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत सुस्साट कार चालवली होती. या अपघातात त्याने दोन जणांना धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरातून संतापाचे वातावरण पसरले होते. तर, या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांना अटक करण्यात आली होती. व मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. 


पोर्श गाडी चालवत असनाचा अल्पवयीन मुलासोबत त्याचे आणखी दोन मित्र कारमध्ये होते. अपघातानंतर या तिघांचे रक्त नमुने बदलण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. त्याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांसह ससून हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि इतरांनी विरुद्ध गुन्हा दाखल आहे. गाडीतील इतर दोन अल्पवयीन मुलं किंवा त्यांच्या नातेवाईकांवर मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. असा असताना पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री आणखी एका अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकास अटक केली आहे.


अल्पवयीन आरोपीला पौढ ठरवणार?


कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला प्रौढ ठरवण्याबाबतच्या अर्जावर येत्या 28 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. मद्यपान करून सुसाट वेगाने कार चालवत असताना झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेला तीन महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीला त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन प्रौढ ठरवण्यात यावं यासाठी पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळात अर्ज दाखल केलेला आहे. 


या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरोधातील दोषारोपपत्र आधीच दाखल केलेलं आहे. अपघाताच्या गुन्ह्यात मुलाला जामीन मिळालेला आहे. तर त्याचे आई-वडिल आणि ससूनमधील डॉक्टर अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.  कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी संदर्भात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जावर युक्तिवाद होऊन त्याच दिवशी म्हणजे 28 ऑगस्ट ला निकाल येण्याची शक्यता आहे.


पोर्शे कार ताब्यात घेण्याप्रकरणी अर्ज


कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी पोर्शे कार ताब्यात घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील महागडी कार ताब्यात देण्यात यावी, असा अर्ज अगरवाल यांनी बाल न्याय मंडळात केला आहे. या अर्जावर पोलिसांनी त्यांचे म्हणणे मांडावे,असे आदेश न्यायालयाने दिले होते. अगरवाल यांच्या अर्जावर न्यायालय २८ ऑगस्ट रोजी निर्णय देणार आहे.