Unseasonal Rain : उन्हाळा तोंडावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. (Pune Rain update imd alert about thunderstorm rain in maharashtra latest rain updates news)


पुण्यात पावसाची जोरदार हजेरी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहरात (Pune Rain News) पावसाचे जोरदार हजेरी लावली. शहरातील मुख्य परिसरासह पाषाण, सूस रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, वारजे, कोंढवा, कोथरूड, हडपसर, केशवनगर आदी भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. संध्याकाळी 5 वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने रात्री साडेआठनंतर संपूर्ण शहरात हजेरी लावली.


IMD चा इशारा 


महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवसांत काही ठिकाणी ढगांच्या गडगडाट आणि विजांचा कडकडाट हलका-मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याचा देखील सामना करावा लागू शकतो. तसेच 16 आणि 17 मार्च गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.



कोणत्या भागात अलर्ट जारी?


मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.


सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी...


सातारा (Satara) जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.सातारा शहरासह,खंडाळा, वाई ल,जावली कोरेगाव तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता सांगितली आहे.


नंदुरबार जिल्ह्यात  दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस


नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar) सलग दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाची हजेरी लावली, गेल्या आठवड्यात ही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी हिरवाला होता. वादळ वाऱ्या आणि विजेच्या कडकडात सह पावसाची जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, तळोदा, धडगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेले, मका, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान होणार आहेत तर फळबागातील पपया आणि केळीच्या देखील मोठ्या नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन मिळवण्यासाठी संपावर गेले असल्याने याच्या फटका अवकाळी पावसात फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर होणार आहे. 


आणखी वाचा - Maharashtra Weather: वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस; विदर्भात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट


दरम्यान, अवकाळी पाऊस एका आठवड्यात आज तिसऱ्यांदा पाऊस झाला आहे. त्यामुळे संपावर गेले असलेल्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कशी मिळणार हा प्रशम अनुत्तारित आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेऊन ठेवा माला ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ओला झाला आहे.