Pune flood Alert : मुसळधार पावसाची संततधार...आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस...अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं झालेला महाआक्रोश....पुन्हा एकदा मुसळधार पावसानं पुणेकरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाभयंकर पुरातून सावरत असतानाच पुणेकरांना पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जोरदार तडाखा दिला. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला. त्यामुळं संपूर्ण पुणे पाण्याखाली गेल्याचं भयावह चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला, तर अनेक ठिकाणी पूरस्थिती दिसत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडकवासला परिसरात मोठा पाऊस असल्याने विसर्ग 35,000 क्युसेकवरुन 45,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच अन्य प्रशासनाशी सातत्याने सिंचन विभाग संपर्कात असून, लष्कर आणि एनडीआरएफ अलर्ट मोडवर आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


मध्यरात्री कोणत्या अडचणी येऊ नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती नागरिकांसह सर्व यंत्रणांना देण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.



पुण्यातील पूरस्थितीनंतर सरकार अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे आदेश दिलेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारी घेतलीय. दुसरीकडे बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी दुरध्वनीवरून अधिका-यांकडून माहिती घेतलीय. 


दरम्यान, मुसळधार पाऊस तसंच खडकवासला धरणातून होणारा विसर्ग.. यामुळे नदीकाठच्या गावांना तसंच सोसायटींना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागानं दिलाय. मात्र यंदा वारंवार पुण्याला पुराचा फटका बसत असल्यानं चिंतेचे ढग दाटून आलेत.