पुणे रिंगरोडसाठी पंधराशे कोटींचा निधी मंजूर
पुण्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत रिंग रोडसाठी केंद्र सरकारनं पंधराशे कोटींचा निधी मंजूर केला आहे.
पुणे : पुण्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत रिंग रोडसाठी केंद्र सरकारनं पंधराशे कोटींचा निधी मंजूर केला आहे.
पीएमआरडीए हा रिंग रोड उभारणार आहे. केंद्राच्या मदतीमुळे पुण्याभोतीच्या रिंग रोडचं काम वेग घेण्याची शक्यता आहे.
128 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाला 7 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 110 मीटर रुंदीच्या या रिंग रोडला 42 रस्ते मिळणार आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांचा प्रवासाचा त्रास थोडा कमी आणि अधिक वेगवान होण्याची शक्यता वाढली आहे.