पुणे : पुण्यातील फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही लैगिंक शोषणाचा प्रकार पुढे आलाय. संस्थेतील एका विद्यार्थिनीनं थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केलीय. संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या बाबतीत लैंगिक शोषणाची वारंवार तक्रार करुनही एफटीआयआयचे संचालक आणि एफटीआय प्रशासनानं लक्ष दिलं नसल्याचा आरोप या विद्यार्थिनीनं आपल्या तक्रारीत केलाय.


तसंच तक्रार केल्यानंतर कामात अडथळे आणण्यात आल्याचा आरोपही केलाय. तर संचालकांनी विद्यार्थिनीचे आरोप फेटाळलेत. संबंधित विद्यार्थिनीच्या शैक्षणिक तक्रारीमुळे तिची शिष्यवृत्ती नाकारल्याचं स्पष्ट केलंय.