VIDEO : `गणपती`चोर दोन तासांत पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातल्या लष्कर ऊभागातल्या प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरातील चोरीला गेलेली पंच धातूची मूर्ती लष्कर पोलिसांमुळे दोन तासात परत मिळाली. लष्कर भागात सोनारांची बाजारपेठ आहे. इथे सिद्धीविनायक मंदिरातून मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजल्याच्या सुमारास पाच किलो वजनाची पंचधातूची भरीव मूर्ती चोरीला गेली.
पुणे : पुण्यातल्या लष्कर ऊभागातल्या प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरातील चोरीला गेलेली पंच धातूची मूर्ती लष्कर पोलिसांमुळे दोन तासात परत मिळाली. लष्कर भागात सोनारांची बाजारपेठ आहे. इथे सिद्धीविनायक मंदिरातून मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजल्याच्या सुमारास पाच किलो वजनाची पंचधातूची भरीव मूर्ती चोरीला गेली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. हे फुटेज सर्वठिकाणच्या पोलिसांना पाठवण्यात आलं. त्यानंतर पुणे स्थानकात एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळली.
या व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे गणपतीची मूर्ती सापडली. ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव अमर अवघडे असं आहे.