पुणे : पतंगराव कदम यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी म्हणजेच सिंहगड बंगला इथं ठेवण्यात आल आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी पतंगरावांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसामान्यांसह, राजकारणी आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी पतंगराव कदम यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. सकाळी १०ते ११.३० पर्यंत धनकवाडी इथल्या भारती विद्यापीठ या शैक्षणिक संकुलात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचं जन्मगाव असणा-या सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी शोकाकूल वातावरण आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीला मोठा धक्का बसलाय. पतंगराव कदम यांचे लहान भाऊ जयसिंगराव कदम यांना जबर धक्का बसलाय. वटवृक्ष कोसळल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय.