Pune Metro: पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. ट्रॅफीक ही पुणेकरांची न सुटणारी समस्या आहे. यासाठी मेट्रोचा पर्याय पुणेकरांना देण्यात आलाय. दरम्यान दूरच्या स्थानकांमुळे पुणेकरांची तारांबळ होत होती. आता यासाठी महाराष्ट्र मेट्रोल रेल्व कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महा मेट्रोने महत्वाचा निर्णय घेतलाय. पुणेकर आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या मागणीचा पुरवठा करण्यात आलाय. स्वारगेट ते कात्रज भूमिगत मार्गावर बालाजी नगरमध्ये नवे स्थानक येणार आहे.  या स्थानकासाठी पुणे नगर निगमने परवानगी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालिकेच्या स्थायी समितीमध्ये नव्या मेट्रो स्थानकासंदर्भात प्रस्तावावर चर्चा झाली. महामेट्रोने स्वारगेट-कात्रज दरम्यान भूमिगत मार्गावर बालाजी नगरमध्ये मेट्रो स्थान बनवण्यासाठी परवानगी मागितल्याचे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले.  दरम्यान नव्या रेल्वे स्थानकामुळे नागरिकांवर कोणता अतिरिक्त भार येऊ नये, या अटीवर पीएमसीने परवानगी द्यायला हवी, असा निर्णय घेण्याचे ठरले. 


पुणेकरांना हेल्मेट सक्ती लागू का होत नाही? 6 ठळक कारणे!


स्वारगेट-कात्रज भूमिगत एस्टेंशन लाइनवर अतिरिक्त स्थानकासाठी मंजूरी  द्यायला हवी, असे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा संयुक्त प्रकल्प महामेट्रोने म्हटले. पीएमसीने 2021 मध्ये 5.463 किमी लांब 3 भूमिगत स्थानकांसोबत स्वारगेट-कात्रज विस्तार मार्गाला मंजूरी दिली होती.  महामेट्रो अंतर्गत चालवली जाणारी ही 2,954.53 कोटी रुपयांची परियोजना आहे.  बालाजी नगरजवळ एक अतिरिक्त भूमिगत स्थानक उपलब्ध केल्यास या स्थानकावरील प्रवाशांची संख्या वाढेल आणि बालाजी नगर, धनकवाडी आणि बिबवेवाडीच्या स्थानिकांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. पुण्यातील स्थानिक आणि लोकप्रतिनिधींकडून यासंदर्भात मागणी केली होती, असे महामेट्रोचे प्रबंध संचालक श्रवण हार्डिकर यांनी म्हटलंय. 



डीपीआरनुसार स्वारगेट आणि कात्रज दरम्यान मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी 3 भूमिगत रेल्वे स्थानके आहेत. यातील अंतर साधारण 1.9 किमी इतके आहे. मेट्रोच्या मानकांनुसार, अंतर-स्थानकातील अंतर साधारण 1 ते 1.5 किमीपर्यंत असावे. 4 भूमिगत स्थानकांना समायोजित करायला हवे, असे हार्डिकर म्हणाले. प्रवाशांची संख्या आणि आजुबाजूच्या परिसरात होत असलेल्या विकास पाहता चौथ्या स्थानकाची गरज असल्याचे हारिकर सांगतात. महामेट्रोने यासाठी तांत्रिकदृष्ट्या तपास केला असून हे स्थानक शक्य असल्याचे सांगण्यात आले आहे. पीसीएमसी-निगडी एक्सटेंशन लाइनच्या प्रकरणात एक चौथे स्थानक सुरु करण्यात आले आहे. यासाठी पिंपररी चिंचवड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक प्रस्ताव पारित करण्यात आल्याचे हार्डिकर म्हणाले.