पुणे: पुण्यात विकृतीचा कळस गाठणारी घटना घडली आहे. पुण्यात अल्पवयीन मुलावर त्याच्याच मित्रानं अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला आहे. दांडेकर पूल इथं ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओळखीचा फायदा घेऊन आरोपीनं पीडित मुलाला जवळच्या स्वच्छतागृहात नेलं आणि त्याला मारहाण करुन अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केले.. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पीडित मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


तळजाई पठार इथे राहणारा एक अल्पवयीन मुलगा दांडेकर पूल इथे त्याच्या मित्राच्या घरी आला असता. त्याचा जुना मित्र सागर सोनवणे भेटला. ओळखीचा फायदा घेऊन जवळच्या स्वच्छतागृहात नेऊन त्याला मारहाण करून अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केले. 


या घटनेची माहिती कुटुंबातील सदस्यांना सांगताच त्यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन कडे धाव घेतली आणि सदर आरोपीला तपास पथकाने शोधून अटक देखील केली. ज्या अल्पवयीन मुलाजवळ ही घटना घडली.


पीडित मुलावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियन 2012 कलम 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली आहे.


विकृती मानवाला कुठल्या थरावर नेऊ शकते याचा विचार जन सामान्य करूच शकत नाही.अल्पवयीन मुलावर त्याच्या मित्रानेच जबरदस्ती करून अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्याची घटना दांडेकर पूल इथे घडली.