मुंबई : भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मंगळवारी या घटनेचे पडसाद राज्यभरात बघायला मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दलित समुदायातील लोक राग व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अशातच काल गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि जेएनयू विद्यार्थी उमर खालिय यांच्यावर काल झालेल्या हिंसेचे आरोप लावण्यात आले आहेत. 


पुण्यात तक्रार दाखल


ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी अक्षक बिक्कड आणि आनंद दौंड नावाच्या दोन युवकांनी पुणे येथील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या विरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पुणे येथे शनिवार वाड्यावर झालेल्या कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर लावण्यात आले आहे. 


लोकांना भडकवण्याचा आरोप


जिग्नेश मेवाणी यांनी आपल्या भाषणातून एका खास वर्गातील लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी भडकवले होते. उमर खालिय यानेही भाषणातून विशेष वर्गाला भडकवले होते. या दोन लोकांच्या भाषणांनंतर विशेष वर्गातील लोक विरोध करण्यासाठी रस्त्यावर आलेत. नंतर या घटनेने हिंसेचे वळण घेतले, असा आरोप करण्यात आला आहे.  


आमदार जिग्नेश मेवाणी यांनी १४ एप्रिलला नागपूरमध्ये जाऊन आरएसएस मुक्त भारत अभियान सुरू करण्याचं वक्तव्य केलं होतं. या भाषणावेळी भारिप नेते प्रकाश आंबेडकर, माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील, लेखिका उल्का महाजन इत्या उपस्थित होते.